विजेचा धक्का लागून झीरो वायरमनचा मृत्यू:पिशोर ठाण्यात नोंद, भिलदरी शिवारातील घटना
महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत भिलदरी शिवारात वीजवाहिनीवरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना अचानक विजेचा धक्का लागल्याने झिरो वायरमन म्हणून काम करणाऱ्या विलास कडुबा मोकासे (५०, रा. पिशोर, ता. कन्नड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. भिलदरी शिवारात वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी विलास मोकासे गेले होते. काम सुरू असतानाच त्यांना अचानक विद्युत प्रवाहाचा…