Headlines

पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त!:दडपशाहीची किंमत सरकारला मोजावी लागेल, जयंत पाटलांचा इशारा

पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त लावून जबरदस्तीने सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणे हे लोकशाही मानणाऱ्या देशात अजिबात योग्य नसून, लोकांवर लादलेल्या या दडपशाहीची किंमत सरकारला निश्चितपणे मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जयंत पाटील म्हणाले,…

Read Full News

मुंबईत 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरनचा आवाज घुमणार:फोर्ट-क्रॉस मैदान परिसरात प्रोटोटाइपची चाचणी, BMCचे ‘घाबरू नका’ आवाहन

मुंबई शहरातील नागरिकांना 8 आणि 9 ऑक्टोबर 2026 रोजी सायरनचा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय, जोड इमारत तसेच क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या प्रोटोटाइप सायरन उपकरणांची पूर्वनियोजित चाचणी या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. या चाचणीदरम्यान सायरन वाजविण्यात येणार असल्याने नागरिकांनी त्याचा आवाज ऐकून घाबरून जाऊ नये, तसेच…

Read Full News

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास 2 महिन्यांहून अधिक विलंब:बिलोली तहसील कार्यालयातील 2 महसूल कर्मचारी निलंबित, जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची कठोर कारवाई

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही न केल्याप्रकरणी बिलोली तहसील कार्यालयातील दोन महसूल कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. नागरिकांना शासकीय सेवा देताना दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश…

Read Full News

नगरसूल–तारूर रेल्वे दुहेरीकरणासाठी 16 दिवसांचा ब्लॉक:25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान अनेक गाड्या रद्द, काहींच्या फेऱ्या अंशतः रद्द तर नांदेडच्या 3 एक्स्प्रेस 70 ते 80 मिनिटे उशिराने

नगरसूल–तारूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2026 या कालावधीत तब्बल 16 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण तसेच सिग्नलिंगशी संबंधित विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही एक्स्प्रेस…

Read Full News

महाज्योतीच्या परीक्षा गोंधळावर अतुल सावे यांचा खुलासा:‘तांत्रिक दोष आढळल्यास परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्ट करू’

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान आंबेगाव येथील एका परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे सुमारे 40 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या प्रकारावर मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण देत, संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तपासात संबंधित परीक्षा केंद्राचा निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास ते केंद्र ब्लॅकलिस्ट करण्याचा…

Read Full News

पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या:औंधमधील राहत्या घरात घडली घटना, कारण अस्पष्ट

पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक होते. पुणे पोलिस दलात भरती झाल्यानंतर ते पदोन्नतीने (श्रेणी)…

Read Full News

मस्क यांच्या स्टारलिंकचा भारतातील प्रवेश जवळपास निश्चित:कंपनीने म्हटले- 20 ग्राउंड स्टेशन व शेकडो अँटेना तयार, फक्त अंतिम सरकारी मंजुरीची प्रतीक्षा

एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाइट इंटरनेट सेवा ‘स्टारलिंक’ भारतात सुरू होण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. कंपनीने सांगितले की, सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे. आता स्टारलिंकला केवळ अंतिम नियामक मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. देशभरात २० स्टेशन आणि शेकडो अँटेना तैनात स्टारलिंकने देशभरात २० गेटवे साइट्स उभारल्या आहेत. हे गेटवे…

Read Full News

बेस्ट वीज उपकेंद्रासाठी सॉल्ट पॅन येथील 132 चौ.मी. जागा:मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

मुंबईतील सॉल्ट पॅन महसूल विभागातील भूखंड क्रमांक ८३ मधील १३२ चौ.मी. शासकीय जागा बेस्ट उपक्रमाला वीज वितरण उपकेंद्र उभारण्यासाठी देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित शासकीय जमीन बेस्ट उपक्रमाला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. या जागेचा वापर…

Read Full News

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली:8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, बचाव पथके मदतकार्यात दाखल

दिल्लीतील मच्छी बाजाराजवळील सीमापुरी परिसरात बुधवारी बहुमजली इमारत कोसळली. वृत्तसंस्था आयएएनएसच्या माहितीनुसार, इमारतीच्या मालकाच्या कुटुंबीयांसह 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. आतापर्यंत 2 मुलांसह 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बचाव पथके मदतकार्यामध्ये गुंतली आहेत. ही इमारत ईदगाह मशिदीजवळ होती. स्थानिकांनी सांगितले की, हा अपघात दुपारी सुमारे 3.10 वाजता झाला. अपघाताच्या वेळी इमारतीच्या…

Read Full News

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज:सोशल मीडियावरील बनावट जाहिरातींपासून सावध राहा

ग्रामीण भागातील नागरिकांना पशुपालनाच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या नावाखाली काही कंपन्या नागरिकांकडून कागदपत्रे जमा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या जाहिरातींना किंवा अनधिकृत व्यक्ती व संस्थांना…

Read Full News