Headlines

'तुम्ही मुके होऊन बसता':नसीरुद्दीन शाह यांच्या सरकारविरोधी वक्तव्यानंतर अभिनेते पुनीत इस्सर संतापले

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या सरकारविरोधी वक्तव्यानंतर अभिनेते पुनीत इस्सर त्यांच्यावर भडकले. ते म्हणाले की, जर त्यांना सरकार आवडत नसेल, तर निवडणूक लढवून त्याचा पराभव करावा. मंगळवारी शाह यांनी फेसबुकवर स्वतःला अभिमानाने ‘वैचारिक नक्षल’ असल्याचे म्हटले होते. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर शिक्षणव्यवस्था कमकुवत करण्याचा आणि तरुणांचा उत्साह खच्ची करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता….

Read Full News

पळशीमध्ये लातुर गुन्हे शाखेच्या् पथकावर हल्ला:सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 6 कर्मचारी जखमी, घरफोडीतील आरोपीच्या अटकेसाठी आले होते पथक

वसमत तालुक्यातील पळशी येथे घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेसाठी आलेल्या लातूर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर जमावाने हल्ला गेला. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी 9 जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी ता. 29 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली…

Read Full News

चिंचवडमधील मार्केटच्या पार्किंगला आग लागली:19 वाहने अन् एका सायकलचे नुकसान; टेरेसवर अडकलेल्या 10 ते 15 नागरिकांची सुटका

चिंचवड गावातील चाफेकर चौकाजवळ असलेल्या चार मजली कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी (29 ऑक्टोबर) मध्यरात्री आग लागली. या आगीत पार्किंगमधील 17 दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि एका सायकलचे नुकसान झाले. दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या 10 ते 15 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत एक पुरुष किरकोळ भाजला असून, त्याला उपचारासाठी तालेरा रुग्णालयात दाखल…

Read Full News

Sanjay Raut Attacks BJP Over Graduate Election Result

महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना नाकारले आहे. शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक झाली ती संस्थाचालकांनी जिंकली, त्यामध्ये शिक्षक किती आहेत? संस्थाचालकच या निवडणुकीत विजयी होतात, कारण यामध्ये पैशाचा म . संजय राऊत म्हणाले की, ठाणे काय कोणाच्या वडिलांचे नाही, आम्ही 3 वाजता ठाण्यात जात आहोत. पूर्णेकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली हे…

Read Full News

आम्ही नवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय पक्षांच्या नाकात दम आणणार:पराभवानंतर कराळे मास्तरांची घोषणा, म्हणाले- वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राहिली ती अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची. तब्बल २४ हजारांहून अधिक मते घेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना…

Read Full News

राहुल गांधी आमचे सर्वांत मोठे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर:त्यांनी पॅकअप करून परदेशात जावे; नितेश राणेंची काँग्रेसवर टीका, म्हणाले- जनतेचा मोदींवर विश्वास

मुंबईतील ससून डॉक येथे मच्छिमारांच्या एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस, राहुल गांधी आणि अभिनेता नसरुद्दीन शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, मच्छिमार समाजाच्या कल्याणासाठी राज्यातील सरकार कशा प्रकारे काम करत आहे, याची माहितीही त्यांनी दिली. ठाण्यातील हत्याकांड आणि ईव्हीएम-बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मच्छिमारांना आर्थिक…

Read Full News

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही:पुण्यात सानप यांना पाठिंबा अन् संभाजीनगरमध्ये विरोधामुळे पराभव- नवनाथ बन

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने युतीचा धर्म न पाळल्याचा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालानंतर पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने एकजुटीला धक्का बसल्याचे सांगत, भाजपने पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले. पुणे पदवीधरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे वंजारी,…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची तेजी, 73,350 वर:निफ्टीही 50 अंकांनी वर; IT आणि बँकिंग शेअर्समध्ये अधिक खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 29 ऑक्टोबरला तेजी आहे. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 73,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची वाढ झाली आहे. तो 22,750 वर व्यवहार करत आहे. IT, मीडिया आणि बँकिंग शेअर्समध्ये आज अधिक खरेदी होत आहे. आशियाई बाजारांमध्ये आज संमिश्र व्यवहार अमेरिकी बाजारात 28 ऑक्टोबरला तेजी होती परदेशी…

Read Full News

मुख्यमंत्री फडणवीसांनी डिलीट केलेल्या ट्विटवरून रोहित पवारांची टीका:म्हणाले- सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे, कदाचित बॅलेट पेपरचा विसर पडला असेल

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार अभिजित वंजारी यांनी मिळवलेल्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी आधी केलेले आणि नंतर डिलीट करावे लागलेले एक ट्विट तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर झालेली निवडणूक, या मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी थेट फडणवीसांना…

Read Full News

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेचे 7 वर्षे शोषण:पतीच्या मित्रावर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अश्लील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 29 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तुकाराम गणपत गायकवाड (वय 35) याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तुकारामची फिर्यादी महिलेच्या पतीशी ओळख होती. याच मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने मे 2019 ते 20 ऑक्टोबर 2026 या…

Read Full News