अर्धा किलोमीटर चालणार आणि मोर्चा यशस्वी झाल्याचं दाखवणार:ठाकरेंच्या मोर्चावर संजय शिरसाट यांची खोचक टीका, काय म्हणाले शिरसाट?
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काढण्यात आलेला ‘गर्जना मोर्चा’ चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधून जोरदार टीका केली आहे….