एसटी बस-मोटारसायकलची समोरासमोर धडक:चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू, पैठण शहरातील भीषण अपघात
पैठण शहरात एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) दुपारी तिन वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडला. अशोक भालेराव (रा. नांदर, ता. पैठण) आणि कृष्णा गायकवाड (रा. जालना) अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा गायकवाड यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचाही या अपघातात मृत्यू झाला….