Headlines

इंटरनेट बंद करून सत्य जगापासून लपवता येणार नाही- राज ठाकरे:कर्जतमधील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

कर्जतच्या सह्याद्रीच्या कुशीत टॉरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात आणि प्रशासनाने लादलेल्या इंटरनेट बंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. बुधवारी सकाळी बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी कर्जत येथील पोलिस मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “इंटरनेट बंद करून सत्य जगापासून लपवता येणार नाही,’ अशा शब्दांत…

Read Full News

सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल अरेस्टला ‘डिजिटल दरोडा’ संबोधले:म्हटले- अशा निर्दयी गुन्हेगारांशी अत्यंत कठोरपणे निपटले पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल अटकेद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीला ‘डिजिटल दरोडा’ असे संबोधले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, हा सामान्य खंडणीपेक्षा अधिक गंभीर गुन्हा आहे. व्हिडिओ कॉलद्वारे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. अशा निर्दयी गुन्हेगारांशी अत्यंत कठोरपणे deal केले पाहिजे. न्यायालयाने असेही म्हटले की, कायद्यात खटला सुरू होण्यापूर्वी शिक्षा देण्याची तरतूद असेल, तर तिचाही वापर…

Read Full News

घृष्णेश्वराचे श्रावणात भुयारी मार्गाने अडीचऐवजी तासाभरात दर्शन होणार:सिमेंटऐवजी दगड-चुन्याचा वापर; 70% काम पूर्ण, उर्वरित जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होईल

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १२वे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर (वेरूळ) विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. घृष्णेश्वराचे श्रावणात भुयारी मार्गाने अडीचऐवजी तासाभरात दर्शन होणार आहे. या २१० कोटींच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ये . मंदिराचा १३.२ एकर परिसर अतिक्रमणमुक्त करून एकूण २० एकरांत भाविकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उभारल्या जात आहेत. आतापर्यंत ७०% काम पूर्ण झाले. जानेवारी २०२७ पर्यंत…

Read Full News

अंबाजोगाईत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 4 रुग्णांची दृष्टी अधू; ‘स्वाराती’तील प्रकार:10 दिवसांनंतर प्रकार उघडकीस, दृष्टी पूर्ववत न झाल्याने रुग्ण चिंतेत

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (स्वाराती) नेत्र विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ४ रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग होऊन त्यांची दृष्टी अधू झाल्याचा धक्कादायक प्रकार १० दिवसांनंतर समोर आला आहे. २५ पैकी १७ रुग्णांवर १७ ऑ . ७ दिवस उपचार, तरीही त्रास हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीला लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांना बोलावले. त्यांच्या सल्ल्यानुसार…

Read Full News

80 हजार रुपयांचे इंजेक्शन 7 हजार रुपयांत मिळणार:कर्करोगाच्या 543 औषधांच्या किमती कमी, 9 नोव्हेंबरपासून लागू होतील नवीन किंमती

देशातील कर्करोगाच्या 543 औषधांच्या ब्रँड्स आणि पॅकच्या कमाल किरकोळ किमतीत बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरणाच्या (NPPA) निर्णयानंतर 397 म्हणजेच 73% औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यापैकी 217 औषधांच्या किमती निम्म्याहूनही कमी झाल्या आहेत. तसेच, 97 ब्रँड-पॅकच्या किमतींमध्ये 70% पेक्षा जास्त, तर 50 पॅकच्या किमतींमध्ये 80% पेक्षा जास्त कपात झाली आहे. पाच…

Read Full News

दरमहा 3.20 लाख वेतन घेणाऱ्या मंत्री, आमदारांनाही 5हजार दुष्काळी अग्रिम:पहिल्या जीआरमधील जाचक अटी शासनाने रात्रीतून वगळल्या

दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदत देण्याच्या शासन निर्णयात 24 तासांच्या आत मोठा बदल करण्यात आला. 27 ऑक्टोबरच्या सायंकाळी काढलेल्या मूळ आदेशात शासनाकडून 3 लाख 19 हजार 520 रुपये दरमहा घेणाऱ्या परंतु शेतकरी असलेल्या विद्यमान आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच सरकारी नोकरदार आणि आयकरदात्यांना या मदतीतून अपात्र ठरवले होते. मात्र, या…

Read Full News

Treat digital arrests as strictly as robbery

Marathi News National Treat Digital Arrests As Strictly As Robbery Supreme Court, Cases From 12 States Are Not Together दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘डिजिटल दरोडा’ असे म्हटले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, हा सामान्य खंडणी वसुलीपेक्षा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विशेषतः वृद्धांना लक्ष्य केले जाते….

Read Full News

व्याजात अडकवून 35 लाख रुपयांची खंडणी:चाबुकस्वारच्या टोळीवर तिसरा गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील घटना

व्याजाच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारी टोळीच्या अनेक गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि प्रवीण पंडितराव गरबडेसह त्यांच्या साथीदारांविरोधात सावकारी कायदा आणि खंडणीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘डबल मोक्का’ लावलेल्या याच कुख्यात टोळीचा महिनाभरातील हा…

Read Full News

4,000 Indian pilgrims stranded in Saudi Arabia, flights disrupted due to attack, return journey becomes expensive

Marathi News National 4,000 Indian Pilgrims Stranded In Saudi Arabia, Flights Disrupted Due To Attack, Return Journey Becomes Expensive मोहंमद जमीर हसन | हैदराबाद2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उमरासाठी सौदी अरेबियाला गेलेले ४ हजारांहून अधिक भारतीय यात्रेकरू उड्डाणे रद्द झाल्यामुळे तेथेच अडकले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती हल्ल्यानंतर उड्डाणे प्रभावित झाल्याने…

Read Full News

‘तिकीट दिलं असतं तर विजयी जल्लोषात घरी आलो असतो’:नितेश कराळे मास्तरांची पक्षावर नाराजी, म्हणाले ‘आमच्या पराभवाचीच जास्त चर्चा’

राज्यातील 5 विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विशेष चर्चेत राहिली. या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला, तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी तब्बल 25 हजारांहून अधिक मते मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहूनही कराळे यांची चर्चा मात्र विजय मिळवलेल्या उमेदवाराइतकीच होत आहे….

Read Full News