दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा:अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीची जबाबदारी घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना निर्देश
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्यापासून ते पीक नुकसान पंचनामे, नुकसानभरपाई आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे…