Headlines

किनगावात पथसंचलनावर दगडफेक; 7 जण जखमी:जळगावच्या यावल तालुक्यातील घटना

जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचा एका समुदायाने रस्ता अडवल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांना ४ तास समजुतीनंतरही तोडगा न निघाल्याने सौम्य बळाचा वापर करावा लागला. या वेळी जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संघाचे प्रचारक असे ७ जण जखमी झाले. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले असून चोख बंदोबस्तात…

Read Full News

फायनान्स कार्यालयात शेतकरी मृत्युप्रकरणी नांदेड पोलिसांनी 3 कर्मचाऱ्यांना केली अटक:आणखी एका तरुणाची कंपनीविरुद्ध अपहरण, मारहाणीची तक्रार

हिंगोली गेट परिसरातील खालसा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कर्जवसुलीसाठी त्यांचे अपहरण करून दोन दिवस डांबून बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून वजिराबाद पो . २२ ऑक्टोबर रोजी चंद्रकांत शिंदे यांना गावातून दुचाकीवर डांबून आणण्यात आले होते. कार्यालयात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पत्नी ज्योती…

Read Full News

हैदराबादेत उन्हाळ्यासारखे जलसंकट, टँकरच्या मागणीत 233% वाढ:20 हजार बोअरवेल कोरडे, बासर विद्यापीठात ऑनलाइन वर्ग

तेलंगणाच्या हैदराबादेत मान्सून संपून अवघे १७ दिवस झाले असतानाच उन्हाळ्यासारखी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात साधारणपणे मार्चपासून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असे, मात्र यंदा ऑक्टोबरमध्येच दररोज ८ हजार टँकर बुक केले जात आहेत. जल मंडळाच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ६२,५६५ टँकर बुक झाले आहेत, तर गेल्या वर्षी याच कालावधीत १८,८०६ बुकिंग झाली होती. म्हणजेच मागणीत २३३%…

Read Full News

स्मार्ट बोर्डाची किंमत आठपट वाढवून 80 लाखांचा घोटाळा:अकोला महापालिकेच्या 10 शाळांसाठी 10 डिजिटल बोर्ड खरेदीमध्ये अपहार, सव्वा लाखाचा बोर्ड 9.20 लाखांना

महानगरपालिकेच्या १० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी १० डिजिटल स्मार्ट बोर्ड ९२ लाखांत खरेदी करण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळाकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात एका नामांकित कंपनीचे हे बोर्ड . ‘दिव्य मराठी’कडे नियोजन मंडळाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पुरावा आहे. तसेच “दिव्य मराठी’च्या पाहणीत शाळांत बसवलेले बोर्ड दुसऱ्याच कंपनीचे दिसले. बोर्डावरील स्टिकर, पॅकिंग व…

Read Full News

Water crisis in Hyderabad 17 days after monsoon returns; Tanker demand increases by 233 percent

Marathi News National Water Crisis In Hyderabad 17 Days After Monsoon Returns; Tanker Demand Increases By 233 Percent मोहंमद जमीर हसन3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हैदराबादमध्ये मान्सून परतल्यानंतर अवघ्या १७ दिवसांनंतर उन्हाळ्यासारखे जलसंकट उभे राहिले आहे. शहरात साधारणपणे मार्चपासून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असते, पण यावेळी ऑक्टोबरमध्येच दररोज ८ हजार टँकर बुक होत आहेत. जल बोर्डाच्या…

Read Full News

तुळजापुरात आश्विन पौर्णिमेला 3 लाख भाविक नतमस्तक:आज 5लाखांचा अंदाज, आई तुळजाभवानीची श्रमनिद्रा संपणार; दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विन पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी तब्बल ३ लाख भाविकांनी हजेरी लावली. सोमवारी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असून ५ लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गतवर्षी याच दिवशी च . नवरात्र महोत्सवानंतर तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची आश्विनी पौर्णिमा यात्रा भरली आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांचे लोंढे तुळजापुरात दाखल…

Read Full News

"तिसरी मुंबई’ ठरेल राज्याचे नवे ग्रोथ इंजिन- फडणवीस:नैना क्षेत्रामध्ये 15 लाख रोजगारांचे उद्दिष्ट

नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासातून १५ लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. यापैकी ५ लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. विशेष म्हणजे या रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उभी राहणारी ही ‘तिसरी मुंबई’ विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल,…

Read Full News

प्रगतिशील शेतकरी:पाणी, खताचे सुक्ष्म नियोजन, केळीच्या एका घडाचे वजन 55 किलोंवर; माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, अचूक नियोजन आणि शास्त्रीय पोषण व्यवस्थापन लाभल्यास प्रतिकूल परिस्थितीतही सोन्यासारखे उत्पादन घेता येते, हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील प्रगतशील शेतकरी हिंदुराव नामदेवराव पिसाळ यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रात केळीचे तब्बल ३७ ते ४० टनांचे विक्रमी उत्पादन मिळवले. यात बागेतील एका-एका घडाचे वजन ५५ किलोपर्यंत…

Read Full News

इचलकरंजीत पत्नीने पतीची वरवंट्याने हत्या केली:दुसरीकडे लग्नास नकार दिल्याने प्रियकराकडून प्रेयसीचा खून

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे घरगुती वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास पती झोपेत असताना त्याच्या डोक्यात वरवंटा घालून पत्नीने त्याचा जीव घेतल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पत्नी आपल्या मुलीला घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाली. सागर बुरसे असे मृत पतीचे नाव असून, वैशाली सागर बुरसे असे आरोपी पत्नीचे…

Read Full News

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात 11 वा आरोपी अटकेत:इंदूरमधून प्रांजल ठकरालला मुंबईत आणले

अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. प्रांजल ठकराल असे या 11 व्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या अटकेमुळे तपासाला महत्त्वाचे वळण मिळण्याची शक्यता आहे. इंदूरमधून…

Read Full News