रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:म्हणाले- शेतकऱ्याच्या हातावर 5 हजाराची थट्टा, कुंभमेळ्यावर 35 हजार कोटींचा खर्च अन् हिशोब नाही
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “एकीकडे दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये टेकवून सरकार त्यांची थट्टा करत आहे, तर दुसरीकडे नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा हिशोब द्यायला सरकार तयार…