Headlines

दुष्काळी मदत सरसकट द्या; जाचक अटी टाळा:शिवसेनेच्या ठाकरे गटाची तहसीलदारांकडे मागणी

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पाथर्डी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली दुष्काळी मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावी. मदत वाटपासाठी जाचक निकष आणि अनावश्यक कागदपत्रांच्या अटी लादू नयेत, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी केली. याबाबत तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदन देण्यात आले….

Read Full News

चित्रांच्या रंगांतून 720 विद्यार्थ्यांनी खुलवली कल्पनाशक्ती!:चित्रकला स्पर्धेत साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला रंगांची साथ मिळाली आणि कागदावर एकाहून एक सुंदर चित्रे साकारली! नवनीत पब्लिकेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘ऑल इंडिया नवनीत ड्रॉइंग कॉम्पिटिशन’ श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या ७२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. स्पर्धेचे तीन गटांत आयोजन…

Read Full News

ISRO GSLV Launch & S Jaishankar G20 Atlanta Visit

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. राष्ट्रीय (NATIONAL) 1. ISRO च्या GSLV-F18 मोहिमेचे प्रक्षेपण 30 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO ने GSLV-F18 मोहिमेचे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात…

Read Full News

आळेफाटा:आळेफाट्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

आळेफाटा परिसरातील संतवाडी रोडवर बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६, रा. संतवाडी, ता. जुन्नर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस…

Read Full News

महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला स्वीकारण्यास शेतकऱ्यांचा नकार:सूरत-चेन्नई महामार्गाचे राहुरी तालुक्यातील भूसंपादन बाधित शेतकरी आक्रमक

कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये द्यायला सरकारकडे पैसे आहेत. इकडे शेतकऱ्यांचे घरदार उद्ध्वस्त करताना कवडीमोल भाव दिला जात असल्याचा संताप महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख लक्ष्मण अंत्रे यांनी व्यक्त करत शेतकऱ्यांनी भूसंपादनाची रक्कम नाकारली आहे. श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालयात राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शेतकऱ्यांना जमिनीच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात येणार होते. शेतकऱ्यांनी ते नाकारले. या महामार्गासंदर्भात नोव्हेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय…

Read Full News

हुंड्यासाठी छळ, उपचारांकडे दुर्लक्ष; विवाहितेचा मृत्यू:पतीसह 9 जणांविरोधात माहेरच्यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

हुंड्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ आणि गंभीर आजारपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने विवाहितेचा पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती अल्ताफ शेख याच्यासह सासरच्या नऊ जणांविरोधात मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, विवाहावेळी माहेरच्या मंडळींनी सुमारे दहा लाख रुपये खर्च केले होते….

Read Full News

अक्षय ऊर्जा:80 कोटींच्या 13 मेगावॅट सौर प्रकल्पातून 4 हजार शेतकऱ्यांना मिळेल दिवसा वीज!

बिबट्याची दहशत अन् रात्रीचे जागरण यामुळे रात्रीचा वीजपुरवठा शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. यापार्श्वभूमीवर ५८ एकर क्षेत्रावर ८० कोटींचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून तब्बल १३ मेगावॅट वीज उपलब्ध होणार असून, त्याचा थेट फायदा वांबोरीसह पंचक्रोशीतील ४ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी…

Read Full News

पारनेर:दगडाचा रुद्राक्ष बनवण्याचा चमत्कार दाखवून वृद्धाची सोनसाखळी लंपास

भाळवणी येथील आठवडे बाजारात देवाचे भक्त असल्याचे सांगत चमत्कार दाखवण्याच्या बहाण्याने एका ६६ वर्षीय वृद्धाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दगडाचा रुद्राक्ष बनवल्याचा बनाव करून वृद्धाचा विश्वास संपादन करणाऱ्या दोन अनोळखी भामट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची साखळी हातचलाखीने लंपास केली. जयसिंग भानुदास खादंवे (वय ६६, रा. टाकळी खातगाव, नगर) यांनी…

Read Full News

महिलांचा रोजगार 8 वर्षांत दुप्पट झाला:मात्र घरगुती कामाचे विभाजन झाले नाही; विश्रांतीसाठी पुरुषांपेक्षा 70 मिनिटे कमी मिळाली

देशात कामकाजाशी जोडलेल्या महिलांची संख्या आठ वर्षांत दुप्पट होऊन २० कोटींच्या पुढे पोहोचली आहे. मात्र त्यांचे जीवन सुकर होण्याऐवजी अधिक व्यस्त झाले आहे. बाहेर नोकरी आणि उपजीविकेची जबाबदारी वाढली, मात्र घर आणि मुलांची काळजी घेण्यात पुरुषांनी हातभार लावण्याची व्याप्ती वाढू शकली नाही. परिणामी महिलांवर दुहेरी ओझे आले आहे. घर आणि बाहेरील कामे पूर्ण करण्याच्या धावपळीत…

Read Full News

गोदाकाठी आज गुंजणार ‘हर हर गंगे… हर हर गोदे’:कुंभगीत अजय-अतुल यांच्या सुरांनी सजली चार मिनिटांची रचना

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये रंगणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे महात्म्य आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. या जागतिक सोहळ्याची महती आणि गोदावरीची पावन परंपरा अधोरेखित करण्यासाठी विशेष ‘कुंभगीत’ साकारण्यात आले असून, संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे. ‘हर हर गंगे… हर हर गोदे’ अशा भक्तीमय ओळींनी सजलेल्या या चार मिनिटांच्या अधिकृत कुंभगीताचे भव्य लाँचिंग शनिवारी…

Read Full News