कन्नडमधील पाणी तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवण्याची मागणी:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर धडक मोर्चा
कन्नड तालुक्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा तालुक्यातील नागरिक आणि पशुधनासाठीच आरक्षित ठेवण्यात यावा, या मागणीसाठी रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. ३०) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिशोर नाका ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत हर्षवर्धन जाधव म्हणाले…