Headlines

छत्रपती संभाजीनगर:दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी

शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे आणि वसूल केलेले शुल्क परत करावे, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालकांना निवेदन देण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या निर्णयानुसार विभागीय केंद्रांतर्गत अभ्यास केंद्रांना तातडीने शुल्क माफीचे आदेश द्यावेत, अशी मागणी…

Read Full News

आरापूर-गवळीशिवरा रस्त्याचे काम रखडले:अतिक्रमण हटवण्यासाठी 10 महिन्यांपासून पत्रव्यवहार निष्फळ; प्रवाशांचे हाल

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या आरापूर-गवळीशिवरा-शिल्लेगाव रस्त्याचे काम गवळीशिवरा गावाजवळील अतिक्रमणामुळे गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने येथे मोठमोठे खड्डे पडले असून, दररोज भाविक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाने गंगापूर तहसील कार्यालय व गवळीशिवरा ग्रामपंचायतीकडे गेल्या दहा महिन्यांपासून…

Read Full News

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक:16 वर्षीय मुलाचा मृत्यू

लासूर स्टेशन | सावंगी शिवारात साई पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी घडली. कृष्णा जनार्दन गवळी (१६,रा. गवळीशिवरा, गाजरमळा ता. गंगापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक नागपूर मुंबई मार्गावरील साई पेट्रोल पंपासमोर उभा होता….

Read Full News

तीन दिवसीय आयोजन:वडनेर आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धा; 15 शाळांमधील 1100 खेळाडू सहभागी

आदिवासी विकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ८ शासकीय आणि ७ अनुदानित अशा एकूण १५ आश्रमशाळांच्या तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना वडनेर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत गुरुवारी सुरुवात झाली आहे. प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विविध आश्रमशाळांचे ११०० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी…

Read Full News

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा:गंगापूजन, मिरवणूक, धार्मिक विधींनी पैठणच्या मोक्षघाटावर आज ध्वजारोहण, 31 फुटी खांबावर 15 फुटांचा ध्वज फडकवणार

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या, संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील मोक्षघाटावर आज सकाळी १०.३० वाजता ३१ फुटी खांबावर १५ फुटांचा ध्वज खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते फडकवण्यात येणार आहे. २००३, २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यांच्या वेळी शाही स्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने…

Read Full News

दिवाळी सुटीत वाढ; आता 23 नोव्हेंबरला भरणार शाळा:22 तारखेला रविवार असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर

दिवाळीच्या सुटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या दिवाळी सुटीत प्रशासनाने तीन दिवसांची वाढ केली आहे. पूर्वी २ ते १९ नोव्हेंबरपर्यंत असणारी सुटी आता २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यातच २२ नोव्हेंबरला रविवार येत असल्याने विद्यार्थ्यांना आणखी एका दिवसाची सुटी मिळेल. त्यामुळे आता थेट २३ नोव्हेंबरपासून शाळांच्या…

Read Full News

एसटी प्रवासात गुंगीचे बिस्कीट देऊन वृद्धाच्या 3 तोळ्यांच्या अंगठ्या चोरल्या:मेंदूवर परिणाम झाल्याने 6 महिने उपचार; शुद्धीवर आल्यावर गुन्हा

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ७५ वर्षांच्या वृद्धाला गुंगीकारक औषध मिसळलेले बिस्कीट खाऊ घालून बेशुद्ध करत, त्यांच्या हातातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी घडली असून, तब्बल ६ महिन्यांनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध पुण्याच्या संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो गुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या…

Read Full News

Here, bank systems are available for rent to commit fraud, from Aadhaar-PAN to UPI PIN, theft system

Marathi News National Here, Bank Systems Are Available For Rent To Commit Fraud, From Aadhaar PAN To UPI PIN, Theft System दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बँकिंग फसवणुकीसाठी गुन्हेगारांना स्वतः सॉफ्टवेअर बनवण्याची गरज नाही. संपूर्ण यंत्रणा भाड्याने मिळते. ऑनलाइन ‘प्ले स्टोअर’वर बँक, वीज-पाणी, गॅस व वाहतूक चलनाच्या नावावर ३६ बनावट ॲप्स आहेत. यातून फसवणूक करणारे सॉफ्टवेअर…

Read Full News

केंद्राकडून पुरवठा ठप्प; चिमुकल्यांचा अतिसार रोखणारी ‘रोटा’ लस मिळेना:वेळेवर डोस न मिळाल्यास डिहायड्रेशन जिवावर बेतण्याची भीती

लहान मुलांना अतिसार आणि गंभीर जुलाबापासून वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोटा व्हायरस लसीचा शहरात मागील ३ महिन्यांपासून मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह सरकारी रुग्णालयांमधून या लसीचा साठा संपला आहे. परिणामी, लसीअभावी शहरातील हजारो चिमुकल्यांचे लसीकरण रखडले असून बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि मनपाकडून दर महिन्याला ५० ते…

Read Full News

चारित्र्यावर संशय, बळजबरीने घटस्फोट:गर्भवती विवाहितेचा गच्चीवरून पडून मृत्यू; सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल, पतीसह सासूला 1 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

चारित्र्यावरील संशय, सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि गरोदर असताना बळजबरीने घेतलेला घटस्फोट या सगळ्या त्रासाला कंटाळून एका १९ वर्षीय गर्भवती नवविवाहितेने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबरच्या रात्री बीड बायपास परिसरातील आल . फिर्यादी वडील रमेश चव्हाण (४०) यांच्या तक्रारीनुसार, सोनूचा विवाह १२ जून २०२५ रोजी विनोदशी झाला होता. लग्नानंतर काही…

Read Full News