हिंगोलीत वाळू तस्करांना दणका:24.22 लाखांच्या मुद्देमालासह दोन टिप्पर जप्त, चौघांवर गुन्हा दाखल
सेनगाव तालुक्यातील हत्ता शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 17 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी दिले आहेत.त्यासाठी पोलिसांची पथके स्थापन केली…