Headlines

शासनाकडून निधीचा खड्डा; सारथी संगणक काेर्सला ब्रेक:42 हजार मराठा तरुणांचे प्रशिक्षण अर्धवट

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील तरुण-तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-डीईईपी) सुरू केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून सोलापूरसह राज्यभरातील प्रशिक्षण केंद्रांना निधीच दिला जात नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. त्यामुळे गेल्या या…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:84 तासांची बचावमोहीम अखेर पूर्ण; 9 जणांचा मृत्यू, पर्यावरण विभागाला नोटीस बजावण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोध आणि बचावकार्य सलग ८४ तासांनंतर पूर्ण झाले आहे. या घटनेत एकूण ९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मृतांच्या . मनाला सुन्न करणारी घटना या हृदयद्रावक घटनेवर पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी…

Read More

आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून ‘लव्ह जिहाद’चा वाद:त्यांचे चित्रपट पाहण्यापूर्वी विचार करावा- राणे, येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल- शिरसाट

अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वापेक्षा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे. या लग्नावरून राज्याचे मंत्री नितेश राणे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानवर निशाणा साधत गंभीर स्वरुपाची विधाने केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे “लव्ह जिहाद’च्या संदर्भातून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात…

Read More

चौघे ताब्यात:चॅटिंगच्या वादात तरुणाचा भोसकून खून, नातेवाइकांचा 10 तास ठिय्या, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना

सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील तरुणाचा ७-८ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकले, तसेच डोक्यात विटा, काठ्या मारून खून केला. ज्ञानेश्वर व्यंकटी वाकडे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ घडली. आरोपींना अटक करून त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी १० तास मृताच्या नातेवाइकांनी…

Read More

मुकुंदवाडीत झाड वाचवण्यास गेलेल्या दुकानदाराचा जेसीबीच्या घावाने मृत्यू:छत्रपती संभाजीनगर मनपा म्हणते तो जेसीबी अन् चालक आमचा नाही

शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामात कंत्राटदार आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा रविवारी (12 जुलै) बळी गेला आहे. रस्त्याच्या खोदाईत झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी गेलेल्या 55 वर्षांच्या किराणा दुकानदाराला जेसीबीच्या फावड्याचा जोरदार फटका बसला. अतिरक्तस्राव झाल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. मुकुंदवाडीतील स्वराजनगरात घटना घडली. संजय पंढरीनाथ चौधरी (55, रा. स्वराजनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा…

Read More

प्रगतिशील शेतकरी:झिगझॅग लागवडीतून अवघ्या 1 एकरात डाळिंबातून 42 लाख उत्पन्न, सांगोला तालुक्यातील अजनाळेच्या शेतकऱ्याचा प्रयोग

द्राक्षबागेतील मोठ्या नुकसानीनंतर खचून न जाता सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील प्रयोगशील शेतकरी साधू किसन कोळवले यांनी डाळिंब लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. क्रॉस (झिगझॅग) पद्धतीने अवघ्या एका एकरात १,००० झाडांची लागवड करत त्यांनी १८.५ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेतले. बाजारात प्रति किलो २०० ते २११ रुपये दर मिळाल्याने त्यांना सुमारे ४२ लाखांचे उत्पन्न मिळाले. कमी क्षेत्रातून…

Read More

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून सुरू झाली लव्ह स्टोरी

लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज पाठवत आहे. मुलीने आपल्या बहिणीला जो व्हिडिओ पाठवला आहे, त्यात ती मोठ्याने रडत आहे, मात्र त्यात ती काही बोलत नाहीये. याशिवाय अल्पवयीन मुलीने व्हॉट्सॲपवर व्हॉइस मेसेज पाठवले आहेत, ज्यात ती म्हणत आहे…

Read More

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC ने म्हटले- यामुळे ओळख-नोंद जुळवणे सोपे होईल

निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला आपल्या आई-वडिलांच्या विशेष सघन पुनरावलोकनाचा (Special Intensive Revision) तपशीलही द्यावा लागेल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनुसार, हा नियम केवळ जुन्या मतदारांपुरता मर्यादित नाही, तर पहिल्यांदा मतदार बनू इच्छिणाऱ्या अर्जदारांनाही लागू होईल….

Read More

माजी CEC चा दावा, मनमोहन म्हणाले होते- मी आत्महत्या करेन:कुरेशी म्हणाले– माजी पीएमचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो; मंत्र्यांची तक्रार करायला गेले होते

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनी त्यांच्या ‘इंडिया अँड आय: ए हंड्रेड मेमोरीज, नॉट ए मेमॉयर’ या पुस्तकात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित एक भावनिक क्षण शेअर केला आहे. कुरेशी यांच्या पुस्तकानुसार, 2012 मध्ये काही मंत्र्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध टिप्पणी केली होती. जेव्हा याची तक्रार मनमोहन सिंग यांच्याकडे करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले…

Read More

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७…

Read More