नवरात्रीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे भगदाड?:14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; 3 मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार, असा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही सांगितले जात…