Headlines

व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साकडे:कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी‎

तालुक्यासह परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकाच्या विक्रीपासून ते कटाईपर्यंतच्या प्रश्नांमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. केळीच्या बाजारभावावर असलेले व्यापाऱ्यांचे नियंत्रण (बोर्ड) हा मुख्य मुद्दा आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाजार समितीच्या वतीने समन्वय बैठक घेण्यात आली. त्यावर तोडगा काढण्यासाठीही चर्चा झाली. विधानसभा क्षेत्राचे आ. गजानन…

Read More

नारायणराव राणा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी खेळांचे आयोजन

स्थानिक नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश मुंदे तसेच प्रमुख अतिथी प्रा. डॉ. नितीन सराफ यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत क्रीडाक्षेत्राचे विद्यार्थ्यांच्या…

Read More

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:मराठा सेवा संघ 36 वा स्थापना दिन; शिक्षणासोबत सामाजिक जाणिवेची गरज- राऊत‎

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवून न थांबता महापुरुषांचे विचार आत्मसात करून सामाजिक भान व विवेक जपला पाहिजे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते अक्षय राऊत यांनी केले. मराठा सेवा संघाच्या ३६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सांस्कृतिक भवनात सकल मराठा समाजातील दहावी, बारावी, सीईटी आणि नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते…

Read More

किनवटजवळ भीषण अपघात:दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या जीपची झाडाला धडक; चौघांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर

श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपला सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिपला नाईक तांड्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या दुर्घटनेत तीन भाविकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण…

Read More

बैलगाडीने रस्ते खराब झाल्याच्या हास्यास्पद उत्तराने ग्रामस्थांचा संताप:हिरपूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला मागितला विकासकामांचा हिशोब‎

हिरपूर येथे सोमवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वादळी ठरली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंवदा मोरे होत्या. ग्रामसभेच्या सुरुवातीला ‘सेल्फ सर्व्हे’अंतर्गत घरकुल लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्य . ग्रामस्थांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा खर्च, शासनाकडून प्राप्त निधी, त्याचा विनियोग याबाबत…

Read More

निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप वृक्षारोपणच्या वतीने कार्यक्रम‎:वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन अन् संवर्धन करणे महत्त्वाचे- डॉ. प्रा. ढोरे

निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप, मोठी उमरी, अकोला यांच्या वतीने चाचोंडी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढते प्रदूषण, बदलते हवामान, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण…

Read More

मुंबईत-बुरखा घातलेल्या 2 महिलांना रुग्णालयाच्या गेटवर थांबवले:बुरखा काढण्याच्या मागणीवरून महिला पोलिसांशी वाद

मुंबईतील बीएमसी संचालित कूपर रुग्णालयाच्या गेटवर बुरखा घालून आलेल्या दोन महिलांना रोखल्याची घटना समोर आली आहे. या महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान रुग्णालयात तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आणि त्या महिलांमध्ये जोरदार वाद झाला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाने सुरक्षेचे कारण…

Read More

खारवगळ नाल्यावर पुल बांधा:7 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण, घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा‎

प्रतिनिधी | चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील खारवगळ नाल्यावर तातडीने पक्का पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे निवेदन सादर केले. येत्या एका आठवड्यात पुलाच्या कामाबाबत ठोस निर्णय न झाल्यास ७ सप्टेंबरपासून खारवगळ नाल्याजवळ बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. घुईखेड येथील खारवगळ नाल्याच्या पलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी…

Read More

सार्शी येथील प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा:वंचितच्या जिल्हा महासचिवांना अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला, तहसीलच्या पायऱ्यावर बसून प्रशासनाचा निषेध‎

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सार्शी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार निर्माण करण्याच्या मुद्द्यावर सोमवार ३१ रोजी तहसील कार्यालयात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंदोलनाची भूमिका घेणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासच . त्यामुळे काही ग्रामस्थांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदविला. २५ ऑगस्ट रोजी आयोजित…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची घसरण:76,900 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंकांनी खाली; फार्मा, रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घसरण आहे. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या घसरणीसह 76,900 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची कमजोरी आहे, तो 24,050 वर व्यवहार करत आहे. फार्मा आणि रिॲल्टी शेअर्समध्ये आज जास्त विक्री आहे. आजपासून दीपा ज्वेलर्सचा IPO खुला होणार दीपा ज्वेलर्सचा IPO आजपासून खुला होणार आहे. गुंतवणूकदार यात 3…

Read More