हरिनाम, महाप्रसाद अन् मल्लांची कुस्ती; घोटणमध्ये परंपरेचा उत्सव
प्रतिनिधी |शेवगाव शेवगाव तालुक्यातील घोटण येथील प्राचीन श्री मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ११ या वेळेत संजय महाराज बिलवाल यांचे हरिकीर्तन झाले. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी…