Headlines

मेळघाटातील पाणीच्या प्रश्नांसाठी आ. कडूंचा मजीप्रा कार्यालयात ठिया:अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा‎

अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. या समस्येसाठी आमदार कडू यांनी गुरूवारी (दि. ४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केले. त्यानंतर मजीप्रा आणि जलजीवन मिशन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली. दरम्यान मेळघाट संघर्ष…

Read More

लेखक, तंत्रज्ञांसारखी मंडळी समाजासाठी मोठी देणं:ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचा अभिप्राय, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव‎

. लेखक, तंत्रज्ञ, संशोधक, खेळाडू, कलावंत ही गुणी मंडळी समाजासाठी मोठी देणगी आहे. त्यामुळे या वारशाची जपणूक करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचा अभिप्राय ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. मोर्शीच्या आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्रा. पंकजसिंह खांबरे यांची जेएसपीएम विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार…

Read More

वरूड परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी:आ. चंदू यावलकरांच्या हस्ते केले जाणार उद्घाटन‎

येत्या २१ जून रोजी होऊ घातलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाच्या निमित्ताने वरूड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. या जागतिक महोत्सवात वरूडकरांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी गिरिधर देशमुख यांनी केले आहे. या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचे उद्घाटन आ. चंदू…

Read More

करमाळ्याच्या खातगाव जि.प. शाळेने उभे केले ‘हरित मॉडेल’:प्लॅस्टिक गोळा करून रोपवाटिका, शिक्षकांच्या जिद्दीमुळे गावागावांत पर्यावरण क्रांती‎

केवळ ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करून किंवा त्या दिवसापुरतेच निसर्गाविषयी वर्तन ठेवून आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. वर्षभर पर्यावरण संवर्धनाबाबत पोषक पद्धतीने वागणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे, हाच नवा दृष्टिकोन या श . निसर्गाच्या सानिध्यातून शिक्षणाची सुरुवात कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव…

Read More

पालखी सोहळ्यात सुविधांसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे:पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढा

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना…

Read More

बार्शी तालुक्यात मशागती पूर्ण; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा:गतवर्षीच्या तुलनेत यंदा चित्र बदलल्याने खत दुकानदार आणि शेतकरी चिंतेत‎

गतवर्षी या महिन्यात जोरदार बरसात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का देणारा वरुणराजा यावर्षी मात्र दडी मारून बसला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने या महिन्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या होत्या, परंतु जून महिन्यातील पहिला आठवडा उजाडत आला तरी तीव्र उन . यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे असेल. सुमारे ९१ हजार २२८ हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. त्यानंतर…

Read More

यमाई तलाव ट्रॅकची दुरवस्था, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पंढरपूर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी‎

. पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे साम्राज्य निर्माण असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यमाई तलावाच्या भराव्यावर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुशोभिकरणही करण्यात…

Read More

अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार‎

“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात…

Read More

अधिक मासानिमित्त शहरात विष्णू याग, कीर्तन सोहळा अन् नेत्रचिकित्सा शिबिर:समाजाच्या विकासासाठी अध्यात्म, समाजसेवा आवश्यक- आ.जगताप‎

प.पू. अमळनेरकर महाराज सेवा समितीच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित नऊकुंडी श्री विष्णू याग, कीर्तन सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ बंधन लॉन्स येथे भक्तिमय वातावरणात झाला. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप…

Read More

कचरा डेपोतील सोलर प्रकल्पाची 25 टक्के पडझड:वादळी वाऱ्याचा फटका, दोन शेड उभारून प्रकल्प विकसित करण्याच्या महापौरांच्या सूचना‎

बुरुडगाव कचरा डेपो येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ५०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला वादळी वाऱ्याचा आणि मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे. सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात होते. सध्या ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प कार्यान्वित होणार होता. मात्र, वीज निर्मिती सुरू होण्याआधीच…

Read More