‘फुलशिवरा'' गावाने घडवले 7 पीएसआय:सख्ख्या भावांची उपनिरीक्षकपदी निवड, युवकांना गावातच मिळतेय प्रशिक्षण
मकसूद शेख | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा गावाने ‘पोलिसांचे गाव’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवघी १८०० लोकसंख्या असलेल्या या गावातील आजमितीस ७ पोलिस उपनिरीक्षक आणि ४९ पोलिस कार्यरत आहेत. गावाची ही ख्याती वसुसायगाव येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाली आहे. दरम्यान, यंदा पोलिस दलात भरती झालेल्या व उपनिरीक्षपदी निवड झालेल्यांचा ग्रामस्थांच्या…