कन्नडमध्ये 16 हजार घरकुले अपूर्ण:142 गावांतील लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित, पंचायत समितीचे दुर्लक्ष
गोरगरीब आणि हक्काचे छप्पर नसलेल्या गरजूंना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत. मात्र कन्नड तालुक्यात या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध योजनांमधील तब्बल १६ हजार ९७ घरे अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. निधीची टंचाई, वाळूचा तुटवडा, प्रशासकीय समन्वयाचा अभाव यांमुळे ही घरे रखडली…