वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई
जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड…