Headlines

गंभीर गुन्ह्यांच्या संख्येनुसार आता मिळणार नवीन पोलिस ठाणे:मात्र पोलिस ठाण्याच्या मंजुरीसाठी कोणतीही डेडलाइन निश्चित नाही

राज्याच्या पोलिस दलात तब्बल ६६ वर्षांनंतर महाबदल झाला आहे. राज्य शासनाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) नवीन पोलिस ठाणे मंजुरीचे जुना निकष कायमचा रद्द केला आहे. यापुढे केवळ लोकसंख्येच्या आधारावर किंवा राजकीय वजनावर नवीन ठाणे मंजूर होणार नाही. तर त्या भागातील दंगल, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, मानवी तस्करी, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, मोठी घरफोडी आणि मोठ्या प्रमाणात…

Read More

शबनम सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या नव्या अध्यक्षा:17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, 19 ऑगस्टच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. शबनम सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकच्या नवीन अध्यक्षा क्रीडा (SPORTS) 2. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची घोषणा आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. झांबियाचे अध्यक्ष हाकांडे हिचिलेमा पुन्हा विजयी करार (AGREEMENT) 4. टाटा पॉवर आणि आयआयटी बॉम्बेत स्वच्छ ऊर्जा संशोधन करार 5. भारत आणि…

Read More

ग्रामसेवकाच्या मृत्युप्रकरणी 6 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल:पारोळ्यामध्ये ग्रामसेवक संघटना आक्रमक

शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ग्रामसेवकांची राज्य संघटना आक्रमक झाल्याने १७ ऑगस्टला मध्यरात्री ६ ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामसेवक संघटनेचे शेकडो पदाधिकारी सकाळपासून पंचायत समिती आवारात हजर झाले. पंचायत समिती व पोलिस ठाण्याच्या आवारात ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त…

Read More

गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या रस्त्यांवरसरासरी दर 28 तासांत एकाचा बळी:2021 पासून 6,500 अपघातांत झाला तब्बल 1,776 जणांचा मृत्यू

मेट्रो, उड्डाणपूल आणि रुंद रस्त्यांमुळे पुण्याचा चेहरा बदलत असला तरी सुरक्षित प्रवासाचे चित्र मात्र धूसर आहे. जानेवारी २०२१ ते १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाहतूक उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात ६ हजार ५०० अपघात झाले असून १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवर सरासरी प्रत्येक २८ तासांत एका व्यक्तीचा बळी जात आहे. २०२१ मध्ये शहरात…

Read More

नागपुरात आश्रमशाळेत विद्यार्थ्यावर शिपायाचा अनैसर्गिक अत्याचार:आरोपीला ठोकल्या बेड्या, पुसागोंदी येथील भटके विमुक्तांच्या आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार

कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील भटके विमुक्तांच्या निवासी आश्रमशाळेत शिपायाने एका विद्यार्थ्यावर १७ ऑगस्टला रात्री अनैसर्गिक अत्याचार केला, तर दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला; एका विद्यार्थिनीलाही ‘बॅड टच’ के . याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिपायाला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर ‘पोक्सो’, बाल न्याय अधिनियम, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तपास…

Read More

भोंदू मनोहर मामाच्या आयुष्याची आता कारागृहामध्ये ‘अमावास्या’:6 गुन्ह्यात 4 महिन्यांपासून तुरुंगात; पूजाअर्चेने दिवसाची सुुरुवात

करमाळा तालुक्यातील घोटी या गावात २७ एकरांवरील आश्रमात स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा भोंदू मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा गेल्या दीड महिन्यापासून सोलापूरच्या कारागृहात ‘सरकारी पाहुणचार’ घेत आहे. स्वत:ला बाळू मामाचा अवतार असल्याचे भासवून आजवर शेकडो भाविकांना त्याने लाखो रुपयांचा गंडा घातला. काहींच्या जमिनी लाटल्या. महिला अत्याचाराचेही त्याच्यावर गुन्हे आहेत. दर अमावस्या, पोर्णिमेला घोटीच्या आश्रमात दरबार…

Read More

2026 Skoda Slavia Facelift India Launch

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्कोडा इंडियाने 18 ऑगस्ट रोजी भारतात आपली प्रीमियम सेडान स्लाव्हियाची फेसलिफ्ट आवृत्ती (व्हर्जन) सादर केली आहे. 2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्टला पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह बाजारात आणले आहे. या कारचे सर्वात मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य म्हणजे मागील प्रवाशांसाठी दिलेली मसाज सीट्स आहेत, जे या सेगमेंटमधील…

Read More

CJP चा दावा- बंगालमध्ये आमचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न:बांकुडा हल्ल्यात अटक नाही, 10 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होईल

कोलकातामध्ये मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे नेते आशुतोष रांका यांनी पश्चिम बंगालमधील भाजप सरकारवर आरोप केले. त्यांनी सांगितले की, सरकार धमकावून सीजेपीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. रांका यांनी आरोप केला की, बांकुरा जिल्ह्यात एका वृद्धाच्या कथित क्रूर हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर कारवाई झाली नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वृद्धाचा मुलगा सीजेपीशी…

Read More

जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार:बोरी व सुखेड गावांमधील महिलांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा

शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला राज्यातील एकमेव बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने मंगळवारी दुपारी १२.१५ ते १ या वेळेत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणार्‍या ओढ्याच्या तीरांवर उत्साहात झाला. दोन्ही गावांमधील महिलांनी सनई, हलगीच्या तालावर ओढ्यावर येऊन, एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत, ही अनोखी परंपरा कायम ठेवली. नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी होणारा सुखेड व बोरी या…

Read More

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित:सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक राहणार आहे, याबाबतची अधिसूचना जाहीर…

Read More