'चंपात राय निर्दोष-निष्कलंक':त्यांनी सर्वांवर विश्वास ठेवून चूक केली; महासचिव झाल्यानंतर गोविंद देव गिरी यांची पहिली मुलाखत
‘चंपत राय निर्दोष आणि निष्कलंक आहेत. हे मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगत आहे. त्यांचा साधेपणा त्यांच्यासाठी संकट बनला. त्यांनी सर्वांवर विश्वास ठेवून चूक केली. लोकांना ओळखण्यात त्यांच्याकडून चूक झाली.’ ‘ट्रस्टच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात काही उणिवा राहिल्या आहेत. जर कोणतीही उणीव नसती तर चोरी कशी होऊ शकली असती? जिथे उणीव राहिली आहे, तिथे सुधारणा केली जाईल….