5348 जालनेकरांनी रचला विश्वविक्रम:एकाच ठिकाणी, एकाच वेळी घडवल्या शाडूच्या गणेश मूर्ती; दैनिक दिव्य मराठीचा अद्विक क्लब व जिल्हा प्रशासनासह ऐतिहासिक उपक्रम
सकाळचे सात वाजण्याआधीच मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांच्या रांगा… हातात शाडू माती घेऊन बाप्पाला आकार देण्यासाठी आतुर झालेले हजारो हात… एका बाजूला बासरी आणि तबल्याचे सूर, तर दुसरीकडे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष… आणि काही मिनिटांतच जालन्याच्या नावावर नवा विश्वविक्रम नोंदवला गेला! एकाच ठिकाणी, एकाच वेळी तब्बल 5,348 शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करून जालनेकरांनी विक्रमाची नवी नोंद…