करारनाम्यांवर सहीसाठी मुख्य अभियंत्याने लाच मागितल्याचा आरोप:पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रमोद ओंभासे ताब्यात; 19 हजारांची मागणी केल्याचा ACBचा दावा
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी 3 वाजता त्यांना तपासासाठी ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे घटकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याची पाच कामे निविदांद्वारे घेतली होती. या कामांची एकूण किंमत 91 लाख 57 हजार 68…