तलाव 75 टक्के भरून देण्याचे नीराउजवा कालवा विभागाचे आश्वासन:तिसंगी तलावात पाणी सोडले, चौथ्या दिवशी उपोषण मागे
नीरा उजवा कालव्यामधून संगीता तलावात पाणी सोडून तो किमान ७५ टक्के भरून दिला जाईल, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. तलावात प्रत्यक्षात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संगीता तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समाधान फाटे यांच्यासह पाच शेतकरी गेल्या चार दिवसांपासून…