मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; बोर दहेगाव शेड फाट्यावर रस्ता रोको:नागपूर-मुंबई महामार्गावर 2 किमीच्या वाहनांच्या रांगा
आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या सततच्या वेळकाढू धोरणाविरोधात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी 10 वाजता नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोर दहेगाव शेड फाटा (ता. वैजापूर) येथे लासूरगाव सर्कलमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दोन तास ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा…