Headlines

शहांचा आज हैदराबादेत ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ मार्च:काँग्रेसच्या SIR वरील भूमिकेला विरोध; नितिन नवीनचाही बिहार, बंगालमध्ये मोर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी हैदराबादमध्ये ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ मार्च काढणार आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून SIR विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पदयात्रा दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काढण्यात येईल. हा मार्च निजाम कॉलेजसमोरील बाबू जगजीवन राम यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन आबिड्समार्गे मोज्जमजाही मार्केटपर्यंत जाईल….

Read Full News

जायकवाडी येथे सैबेरियातून फ्लेमिंगोंचे आगमन:हिवाळी स्थलांतरित पक्षी; धरणात पाण्याची पातळी, मुबलक खाद्याची उपलब्धता

पैठण जायकवाडी परिसरात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागली असून एरंडगाव येथे गुलाबी रंगाची आकर्षक छटा, लांब पाय आणि वैशिष्ट्यपूर्ण वळणदार चोच असलेला फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचा अधिवास शुक्रवारी आढळून आला आहे. बदलते हवामान, जलाशयातील पाण्याची पातळी आणि मुबलक खाद्याची उपलब्धता यामुळे हिवाळ्यात नाथसागर परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढेल, असे संकेत मिळत आहेत. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर…

Read Full News

उर्वशी-नताशाने फॅशन वीकमध्ये केला रॅम्प वॉक:ग्रँड हयातमध्ये जमले बॉलिवूड सेलिब्रिटी; नीता अंबानींनी केली ‘अनंत आश्रय’ची सुरुवात

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये रविवारी ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक ऑक्टोबर २०२६’च्या तिसऱ्या दिवशी अनेक बॉलिवूड स्टार्स आणि मॉडेल्स सहभागी झाले. या कार्यक्रमात नताशा स्टॅन्कोविक, उर्वशी रौतेला, अनन्या बांगर आणि रीती तिवारी यांनी रॅम्प वॉक करत डिझायनर्सचे कलेक्शन सादर केले. दुसरीकडे, रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी रविवारी मुंबईजवळील कर्जत येथे ‘नीता मुकेश अंबानी…

Read Full News

महिनाभरापासून रस्ता खोदून ठेवला:सोयगावात पाइपलाइनचे काम रखडले, उघड्या आसाऱ्यांमुळे अपघाताचा धोका, सोयगाव नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी

शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी महिनाभरापूर्वी सिमेंट रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, अद्याप पाइपलाइनचे काम पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतीच्या संथ का . वॉर्ड क्रमांक एकमधील मुख्य रस्त्यावर पाइपलाइनच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून, या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे तुकडे आणि टोकदार लोखंडी सळ्या (आसारी)…

Read Full News

घाणेगावात शिवाजी महाराज, नांदगाव येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांचे अनावरण:माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते अनावरण

सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, नांदगाव येथे शौर्य आणि महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण शनिवारी झाले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सावळदबारा परिसरातील पाच गावांत सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभही झाला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस…

Read Full News

पुस्तकापासून एआयपर्यंत शिक्षणाची झेप:शिक्षकांच्या मंथनातून गुणवत्तावाढीचा ध्यास, एआयपासून नवोदयच्या तयारीपर्यंत शिक्षकांना नवे धडे

वर्गातील अध्यापनापासून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत. पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरापर्यंत… बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनीही अध्यापनाच्या पद्धती बदलण्याची गरज आहे. याच बदलांचा वेध घेत राजूर केंद्राच्या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी गुणवत्तावाढीच्या विविध पैलूंवर मंथन केले. विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान, इंग्रजी वाचन-लेखन, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवरील मार्गदर्शनातून आगामी शैक्षणिक कामकाजाची…

Read Full News

हतनूर येथे तरुणाने केली गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट:दसऱ्यानिमित्त पुण्याहून आला होता गावी, कन्नड ग्रामीण ठाण्यात नोंद

कन्नड तालुक्यातील हतनूर येथील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि .०१) पहाटे उघडकीस आली. महेश बाबासाहेब कळान्से (२७, रा. हतनूर, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. . मिळालेल्या माहितीनुसार, महेश कळान्से हा नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता. दसरा सणानिमित्त तो गेल्या आठवड्यातच गावी आला होता. शनिवारी रात्री…

Read Full News

Athletes who practice on synthetic will become Olympic champions

Marathi News Local Maharashtra Aurangabad Athletes Who Practice On Synthetic Will Become Olympic Champions Fadnavis, Chief Minister Inaugurates State of the art Facilities At The Divisional Sports Complex छत्रपती संभाजीनगर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक दर्जाचा अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक उभारला जाणे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या ट्रॅकवर दर्जेदार सराव करणाऱ्या खेळाडूंमधून भविष्यात देशासाठी…

Read Full News

विद्यार्थ्यांचा दिवाळी मेळावा गाजला; 30 हजार रुपयांची विक्रमी उलाढाल:माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलमध्ये ‘दिवाळी मेळावा’ उत्साहात

माणिकराव पालोदकर इंग्लिश स्कूलचा ‘दिवाळी मेळावा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली पालोदकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे, मुख्याध्यापिका मनीषा फुके, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. कल्पकता, आत्मविश्वास, उद्योजकतेची भावना वाढावी. प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान…

Read Full News

मुंबईजवळ कर्जतमध्ये 100 एकरांवर उभारणार ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’:अनाथ मुले, वृद्ध व दिव्यांगांसाठी पुढाकार

रिलायन्स फाउंडेशन अनाथ मुले, निराधार वृद्ध व दिव्यांगांसाठी एक अनोखी वस्ती वसवणार आहे. येथे ५ हजारांहून अधिक लोकांना आयुष्यभरासाठी घर मिळेल. मुंबईजवळील कर्जत येथे १०० एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या संकुलाचे नाव ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ असेल. रविवारी या फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी व संचालिका ईशा अंबानी यांनी याचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण…

Read Full News