रविकांत तुपकर यांचा इशारा:म्हणाले- तडीपारीची कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना तडीपारी अन गुन्हेगारांचा सत्कार करणे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रवीकांत तुपकर यांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांना मंगळवारी ता. ४ दिला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते….