ED, CBI सगळं तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही दिपकेंचे भाष्य
सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे….