बँक शाखेचे उद्घाटन:नव्या सहकार कायद्याने शेतकरी, महिला, तरूणांचे सक्षमीकरण, सहकारमंत्री पाटील यांचे प्रतिपादन
महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिक, तरुण व महिलांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन व सर्वसमावेशक सहकार कायदा आणणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केली. सहकारमहर्षी डॉ. वामनरावजी कोरपे यांच्या पुण्यदिनानिमित्त अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतनीकृत सिव्हिल लाइन शाखेच्या (एडीसीसी) उद्घाटनाप्रसंगी…