तरुणाईच्या एकजुटीपुढे हिटलरशाही झुकली:उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची केंद्र सरकारवर जहरी टीका
परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात जेन झीने आंदोलन केले. तरुणाईच्या एकजुटीपुढे ही हिटलरशाही झुकली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. भारतात लोक नव्हे, तर झुरळे राहतात, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांशी वागत आहेत. मात्र तरुणाईच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीप्रकरणी देशभर उसळलेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री…