Headlines

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 9 वा दिवस:जरांगे पाटील-सरकारमधील कोंडी कायम, मागण्यांवर अंमलबजावणीशिवाय उपचार घेणार नसल्याची जरांगेंची भूमिका




मराठा-कुणबी 58 लाख नोंदी, जात प्रमाणपत्र तसेच इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथे 11 वे उपोषण 29 ऑगस्टला सुरू केले. आठव्या दिवशीही म्हणजे शनिवारी जरांगे पाटील आणि सरकारमधील कोंडी कायम होती. दोन दिवसांपूर्वी जरांगेंची मंत्री विखे पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी पाणी प्यायले आणि सलाइन लावण्याचेही मान्य केले. त्यानुसार त्यांना सलाइन लावण्यात आले होते. मात्र, शनिवारी ते म्हणाले की, ‘मी केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय उपचार घेणार नाही.’ दुसरीकडे सरकारच्या पातळीवर काही हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार लाड यांनी सांगितले की, एक-दोन दिवसांत जरांगेंच्या मागण्या कागदावर उतरवल्या जातील. जरांगेंनी उपचारांना नकार देऊ नये : विखे जरांगेंच्या सर्व मागण्यांची सरकारने दखल घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय टिकावेत यासाठी कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे जरांगेंनी उपचारास नकार देऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मंत्री तथा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते म्हणाले की, सरकारने त्यांच्या मागण्यांचा आदर केला असून आपण व अधिकारी पुन्हा त्यांची भेट घेण्यास तयार आहोत. फडणवीसांचा शिंदेंच्या लाडकी बहीणला विरोध जरांगे म्हणाले की, शिंदेंची लाडकी बहीण योजना फडणवीसांना खपली नाही म्हणून त्यांनी ‘लाडकी दीदी’ आणली. मी शांत आहे. मात्र मराठ्यांच्या जिव्हारी वार करू नका. आमच्या हक्काचे आम्हाला द्या एवढेच आमचे म्हणणे आहे. ओबीसींच्या हक्काचा एक टक्काही आम्हाला नको. फडणवीसांकडे लाभार्थी टोळी आहे. हे पोलिस नसून पाळलेले गुंडे आहेत. त्यांचा माज आम्ही उतरवणार, असा इशाराही त्यांनी दिला. आंतरवालीत आज अभ्यासकांची बैठक मराठा आरक्षणाच्या लढ्याला कायदेशीर, घटनात्मक धार देण्यासाठी आंतरवालीत रविवारी सकाळी 10 वाजता राज्यातील अभ्यासक, घटनातज्ज्ञ, कायदेविषयक तज्ज्ञ, जाणकारांची बैठक होणार आहे. आरक्षणाचा प्रश्न केवळ आंदोलनापुरता न ठेवता उपलब्ध नोंदी, शासन निर्णय, कायदे आणि न्यायालयीन निकषांच्या आधारे टिकणारा तोडगा कसा काढता येईल यावर बैठकीत मंथन होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *