Headlines

75विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक अन् सुबक श्री गणेश मूर्ती:भाटगावातील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद‎


.

सर्वांचाच आवडता बाप्पांचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू असताना हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा व पर्यावरणाची हानी होऊ नये या उद्देशाने भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कलाशिक्षक देव हिरे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व एकाग्र होऊन पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती साकारल्या. शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. बोढारे व पर्यवेक्षिका वै. र. गायकवाड यांनी या कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवला. कलाशिक्षक देव हिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी घडवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले, तर अ. ल. बहिरम यांनी ही कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *