Headlines

यूपीच्या लखनऊत रस्त्यांवर चालत आहेत बोटी:बिहारमध्ये 8 लाख लोकसंख्येला पुराचा वेढा, एमपीत 3 दिवसांनंतर बदलेल हवामान




उत्तर प्रदेशात 9 दिवसांपासून पाऊस झाला नाही, मात्र पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये 10 नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने 40 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बिहारमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत खराब आहे. गंडक नदीला आलेला पूर आणि तटबंदी तुटल्यामुळे 6 जिल्ह्यांतील सुमारे 466 गावे पुराच्या विळख्यात आहेत. त्यामुळे सुमारे 8 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 92,730 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातून शनिवारी मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये रिमझिम पावसाचा सिलसिला सुरूच राहणार आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान पूर्व भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 6 ते 7 ऑक्टोबरदरम्यान दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि केरळमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत 8 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा सिलसिला सुरू राहण्याची शक्यता आहे. राजस्थानातून सुमारे 3 दिवसांच्या विलंबाने मान्सून शनिवारी पूर्णपणे परतला. या हंगामात सुमारे 22 टक्के कमी पाऊस झाला आहे. मान्सूनच्या परतीसोबतच राज्यात उष्णताही वाढू लागली आहे. शनिवारी पिलानी (झुंझुनू) येथे दिवसाचे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर गेले. सॅटेलाइट मॅपमध्ये पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती देशभरातील हवामानाची छायाचित्रे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *