Headlines

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी राहणे बंधनकारक- डॉ. संजय गव्हाणे:कन्नड पंचायत समितीत एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक‎




दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून कन्नड तालुका आदिवासी बहुल व डोंगराळ आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री मुख्यालयी असणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी केले. पंचायत समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजना हर्षवर्धन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची तालुकास्तरीय बैठक पार पडली. यावेळी डॉ. गव्हाणे यांनी आरोग्याच्या दुरवस्थेचा आढावा घेतला, तर आमदार जाधव यांनी आरोग्य, महिला-बालकल्याण व शिक्षण विभागात समन्वय ठेवून शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. बैठकीस नगराध्यक्ष शेख फरिन बेगम अब्दुल जावेद, सभापती सुप्रिया घुगे, जि. प. सदस्य डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत, मंजुषा मलदोडे, अर्जुन पाटील, डॉ. दिलीप सिंह राजपूत, रावसाहेब पवार, सुनंदा चव्हाण, केतन काजे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, महिला व बालविकास अधिकारी निलेश राठोड, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणोती हेडाव, डॉ. धनश्री फिरंगी, डॉ. प्रतीक्षा राजपूत, डॉ. प्रद्युम्न आंबेकर, डॉ. प्रदीप कांबळे, डॉ. जाकिर परवेज, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. चेतन काळे, डॉ. तेजस कीर्तीकर व डॉ. सोहेब खान उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके (साळुंखे) यांनी, सूत्रसंचालन संजय भोसले यांनी तर आभार डॉ. सोहेब खान यांनी मानले. नाचनवेल, चिंचोली लिंबाजी व वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून तेथे नवीन इमारती उभ्या कराव्यात, तसेच दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य केतन काजे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *