राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण रविवारी (४ ऑक्टोबर) प्रथमच भाजपच्या विभागीय कार्यालयात अवतरल्याने सर्वच जण अवाक झाले. मंत्री अतुल सावे यांनी आ. चव्हाणांचे स्वागत करीत त्यांना कार्यालयातील कक्षात नेले. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे भाजपचे राष्
.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याने आमदार सतीश चव्हाण तावडेंच्या भेटीसाठी सायंकाळी ५.३० वाजता भाजप कार्यालयात दाखल झाले होते. विशेष म्हणजे भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आलेल्या अनेक नगरसेवकांनी आमदार चव्हाण यांना पाहताच आपण राष्ट्रवादीच्याच कार्यालयात आहोत की काय, असा फील आला. काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर ही बाब बोलूनही दाखवली. अखेर तावडेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

केणेकरांची खदखद, चव्हाणांना मंत्रिपदाचे संकेत
माजी आ. संजय केणेकर यांना मराठवाडा पदवीधरची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना जागा राष्ट्रवादीला सुटल्याने त्यांचा हिरमोड झाला. आपल्या घरी खासदार तावडेंना नेत केणेकरांनी खदखद बोलून दाखवल्याची चर्चा आहे. चव्हाण यांनी तावडेंची भेट घेतल्यानंतर तावडेंनी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल भावना व्यक्त केल्या.
मतदार नोंदणीचा सोपस्कार
पदवीधरची निवडणूक भाजप लढणार नसल्याचे एक वर्षापूर्वीच निश्चित करण्यात आले होते. पदाधिकारी आणि इच्छुकांनी नाराज होऊ नये म्हणून भाजपकडून मतदार नोंदणीचे सोपस्कार पार पाडण्यात आल्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होती.