![]()
येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प लेखक,कवी व व्याख्याते स्वानंद बेदरकर यांनी ‘वंद्य वंदे मातरम्’ या विषयावर गुंफले. या वेळी त्यांनी ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीपासून त्यामागील राष्ट्रभावना, साहित्यिक संदर्भ आणि हिंदू संस्कृतीशी असलेले नाते यांचा सविस्तर उलगडा केला. भारतीय संस्कृतीचा सन्मान म्हणजे वंदे मातरम असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी,त्यांची साहित्यकृती ‘आनंदमठ’ आणि त्यातून समोर आलेले ‘वंदे मातरम्’ यांचा ऐतिहासिक संदर्भ बेदरकर यांनी व्याख्यानातून मांडला. ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणेचा स्रोत कसे ठरले, त्यामागील राष्ट्रभावना कशी विकसित झाली याचे विवेचन त्यांनी केले. हिंदू संस्कृती आणि ‘वंदे मातरम्’ यावरही बेदरकर यांनी प्रकाश टाकला. भारतीय संस्कृतीतील मातृभूमीविषयीची श्रद्धा, तिचे केलेले गौरवीकरण आणि ‘वंदे मातरम्’मधून व्यक्त झालेली मातृभूमीची संकल्पना यांचा परस्परसंबंध त्यांनी विविध संदर्भांच्या आधारे स्पष्ट केला. या व्याख्यानास आमदार सचिन कल्याणशेट्टी,मल्लिना थ कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी,भीमराव साठे,राजशेखर मसुती,प्रभाकर मजगे,अशोक येणगुरे,महेश कापसे,बापूजी निंबाळकर,दिनेश पटेल, चंद्रकांत दसले,शशिकांत लिंबितोटे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह चेतन जाधव,आदित्य जोशी,विलास कोरे,दिगंबरराव डांगे, मल्लिनाथ स्वामी आदी उपस्थित होते.
Source link
व्याख्यानमाला:‘वंदे मातरम्’ने चेतले राष्ट्रभावनेचे स्फुल्लिंग, विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत स्वानंद बेदरकर यांचे प्रतिपादन