![]()
दुष्काळग्रस्त भागांत अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी राज्यात ३०४ तालुक्यांतील पात्र लाभार्थींना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने दिले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात गुरुवारी शासन निर्णय जारी केला. प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मदतीची व्याप्ती वाढली, त्यानुसार धान्यवाटप जून ते ऑक्टोबर या कालावधीत प्रभावित झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांत ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू करून मदतीची व्याप्ती वाढवली आहे. या सर्व ३०४ तालुक्यांतील शेतकरी व शेतमजुरांना यापूर्वी जारी मार्गदर्शक सूचनांनुसारच अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे.
Source link
304 दुष्काळग्रस्त तालुक्यांत शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य:अन्न व नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक जारी