Headlines

"अथर्व फाउंडेशन'चा दिवाळीचा गोडवा; एकझिरा येथे वस्त्रदान:काकोद-शिवपुरीसह उगवा येथील आदिवासी कुटुंबांना फराळाचे वाटप




दीपावलीच्या प्रकाशात स्वतःचे घर उजळवण्यापेक्षा दुसऱ्याच्या झोपडीतील अंधार दूर करण्याचे समाधान अधिक मोठे असते. याचा प्रत्यय अथर्व अनिल मुळे मल्टिपर्पज फाउंडेशनच्या उपक्रमातून आला. समाजातील वंचित, दुर्बल, तसेच आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद पोहोचत नाही. या बांधवांच्या आयुष्यात मायेचा दिवा प्रज्वलित करत फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. स्व. अथर्व सीमा अनिल मुळे यांच्या सहाव्या स्मृतिप्रीत्यर्थ अकोट तालुक्यातील आदिवासीबहुल काकोद-शिवपुरी येथे दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या गावात एकही पक्के घर नाही. बहुतांश नागरिक झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचून शेव, चिवडा, चकली, पेठा अशा फराळाच्या पिशव्या ७५ कुटुंबांना वाटप केल्या. परतीच्या प्रवासात अकोला शहराजवळील उगवा फाट्यानजीक मजुरीसाठी आलेल्या, तसेच मेनकापडाच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सुमारे २५ आदिवासी कुटुंबांना फराळाच्या पिशव्या व वापरण्यायोग्य कपडे देण्यात आले. या उपक्रमात अमोना गावचे सरपंच मदनराव बेलसरे, ग्रामविकास अधिकारी जानराव मोहोड यांचे सहकार्य लाभले. रस्त्यांच्या कडेला पाल व राहुट्या उभारून राहणाऱ्या गरजूंचा शोध घेऊन त्यांनाही फराळ वाटप करण्यात आले. दुःखाचे रूपांतर सेवाव्रतात; कुटुंबियांना केली मदत प्रा. अनिल मुळे यांच्या कुटुंबावर पुत्र स्व. अथर्व यांच्या आकस्मिक निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखाला केवळ आठवणींपुरते मर्यादित न ठेवता अथर्वच्या स्मृती समाजसेवेतून जिवंत ठेवण्याचा संकल्प मुळे कुटुंबीयांनी केला. अथर्व फाउंडेशनच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यात उत्कर्ष शिशुगृहातील बालकांना दरमहा औषधे व दूध पावडर पुरवणे, हिवाळ्यात ब्लँकेट, उन्हाळ्यात पाणपोई, छत्र्या-रेनकोट वाटप, वृक्षसंवर्धनाचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *