Headlines

'…आता तुम्ही खोट्या बातम्या छापता की गडकरी निवृत्त होणार':निवृत्तीच्या चर्चांवर मंत्री नितीन गडकरींचा मिश्किल टोला




केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या याआधीच्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना वारंवार उधाण येत असते. मात्र आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या चर्चांवर मिश्किल टोला लगावला आणि म्हटले, ‘मी जेव्हा काम सुरू केले पाण्यावर, आता माझे 26 वर्षांनी वय वाढले आहे. मग मी म्हणतो की आता तरुण लोक बोलवा, आणि तुम्ही खोट्या न्यूज छापता की गडकरी निवृत्त होणार…’ त्यांच्या या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला. नितीन गडकरी म्हणाले, तर प्रश्न असा आहे की हे जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज करण्याची गरज आहे आणि हे सतत प्रयत्न आहे, हे एक समाज उपयोगी लोकपयोगी गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या हिताच आहे हे तुमची जनरेशन याच्या आधीच्या पत्रकारची जनरेशन होती, तुम्ही करत राहाल, मी करत राहील असं थेंबे थेंबे तळे साचे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नावर या 17 वर्षात ऍग्रोव्हिजनमुळे विदर्भात फरक नाही पडला का, तर हो पडला, मदर डेरी आली का, तर आली, दूध वाढलं का, तर हो वाढलं, माझ्या घरी 100 लिटर दूध होते, माझी डेअरी पहिले बंद पडली होती. आता हळूहळू प्रत्येक शेतकरी बदलत आहे, थोडा वेळ लागेल त्याला आणि तो करण्याचा आपला प्रयत्न आहे, तुमची मदत आहे त्याला, हळूहळू करू नक्की. 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान नागपुरात कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शनाचे आयोजन 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान नागपुरात करण्यात येणार आहे. यंदा या प्रदर्शनाचे 17 वे वर्ष आहे. इतकी वर्षे सरकार काम करत असतानाही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. याबाबत सरकार आणि राज्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी या कोळसा काढल्यानंतर रिकाम्या राहतात त्या रिकाम्या खाणीत पाणी जमलेले आहे, हे पाणी सोलर पंप लावून शेतकऱ्यांना देणार आहोत, भंडारा जिल्ह्यातील मामा तलाव म्हणजेच हजारो मालगुजारी तलाव आहेत त्यातील गाळ काढला जाईल. विदर्भातील शेतीचा विकास, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नागपुरात येत्या 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मध्य भारतातील सर्वात मोठे 17 वे ‘अॅग्रो व्हिजन’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे नवे मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. विदर्भातील जलसंधारणाचे यशस्वी प्रयोग विदर्भात राबवण्यात आलेले जलसंधारणाचे विविध यशस्वी प्रयोग आता जनतेसमोर आणि माध्यमांसमोर आणले जात आहेत. यामध्ये वर्ध्याचा ‘तामसवाडा पॅटर्न’, रामटेकचा ‘तारपत्री बंधारा पॅटर्न’ आणि तलाव निर्मितीचा ‘बुलढाणा पॅटर्न’ यांचा समावेश असून, यामुळे अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. ‘धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावा’ या प्रभावी मंत्रावर आधारित हा जलसंधारणाचा कार्यक्रम विदर्भातील प्रत्येक गावात राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, याच धर्तीवर बिहारमधील पूर नियंत्रणासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण आणि ‘जलसंजीवनी अभियान’ राबवण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही यावेळी करण्यात आली. ‘मदर डेअरी’मुळे दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी विदर्भातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना देण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (NDDB) पुढाकाराने बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तब्बल 850 कोटी रुपयांचा भव्य ‘मदर डेअरी’ प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील दूध संकलनात लक्षणीय वाढ झाली असून, दुधाला चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. याव्यतिरिक्त, विदर्भात राबवण्यात येत असलेला गोवंश सुधारणा कार्यक्रम आणि ‘एम्ब्रिओ ट्रान्सफर’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भविष्यात देशी गाईंच्या दूध उत्पादनातही मोठी वाढ होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *