Headlines

कॉकरोच जनता पार्टीची सातारा जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न:दुष्काळ निर्मूलन व शिक्षण सुधारणांवर भर




सातारा येथे आज कॉकरोच जनता पार्टीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाच्या वतीने आयोजित या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध ज्वलंत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, आगामी काळात तीव्र आंदोलनाची व जनहिताच्या कामांची दिशा ठरवण्यात आली आहे. ​आजच्या या बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि ठराव पुढिल प्रमाणे आहेत: सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात कशी करता येईल, यावर बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली व उपाययोजनांसाठी विशेष रणनीती आखण्यात आली. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. हा पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सभासद वाढीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले. एसआरआयच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, शासनाचे याविरोधात लक्ष वेधले जाणार आहे. ​या बैठकीमुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न अधिक आक्रमकपणे पुढे रेटले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *