Headlines

तरुणावर धारदार शस्त्राने वार; पाच जणांना अटक:मांजरीतील गोपाळपट्टी परिसरातील घटना; सहकारनगरमध्येही तरुणाला बेसबॉल स्टिकने मारहाण




पुण्यातील मांजरीच्या गोपाळपट्टी परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सहकारनगरमध्येही एका तरुणाला बेसबॉल स्टिकने मारहाण केल्याप्रकरणी चौघां आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मांजरीतील घटनेत सिद्धार्थ बसवराज स्वामी (वय २७, रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) जखमी झाला. प्रवीण भारती, नीलेश कुतरवाडे, अखिलेश होनमाने, अभिषेक पात्रे आणि रोहन मांढवे (सर्व रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांना अटक करण्यात आली. स्वामीने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी वाहनचालक म्हणून काम करतो. त्याचा आरोपींशी कोणताही वाद नव्हता. रात्री आरोपींनी विनाकारण त्याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि धारदार शस्त्राने वार केले. आरोपींसोबत असलेल्या एका साथीदारानेही स्वामीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी नागरिकांना धमकावले. पोलीस उपनिरीक्षक एस. म्हेत्रे तपास करत आहेत. सहकारनगरमधील ट्रेझर पार्क परिसरात किरकोळ कारणावरून आर्यन जगदीश जवंजाळ (वय १९, रा. सिंहगड रस्ता) याला बेसबॉल स्टिकने मारहाण करण्यात आली. त्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आर्यन ट्रेझर पार्क परिसरातील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानात गेला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यापैकी एक आरोपी आर्यनच्या ओळखीचा होता. ‘रागाने का बघतो?’ असे विचारून आरोपींनी त्याला बेसबॉल स्टिकने मारहाण केली आणि तेथून पळून गेले. पोलीस हवालदार एन. कोळगे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *