![]()
हिंजवडी आयटी पार्क परिसरात प्रेमसंबंधातील वादातून आयटी इंजिनिअरने प्रेयसीचा मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. कोमल राजेंद्र डहाके (२७, मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. कोमल व शुभम संगणक अभियंते असून कोमल विप्रो कंपनीत, तर शुभम इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. दोघांचे गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होत होते. रविवारी रात्री दोघे एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते हिंजवडीतील साखरे वस्ती येथील कोमल राहत असलेल्या पीजी निवासस्थानी परतले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रात्रभर मृतदेहाशेजारी बसून कोमल निपचित पडल्यानंतरही आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने हिंजवडी पोलिसांना फोन करून रुग्णवाहिकेची मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता मारहाणीचा प्रकार उघडकीस आला.
Source link
पुण्यात आयटी इंजिनिअरकडून प्रेयसीचा मारहाण करून खून:खुनी अटकेत, प्रेयसीही होती आयटी इंजिनिअर