Headlines

गुजरातसह नागपूर येथून बेपत्ता 3 मुलींची सुटका: बोरगाव मंजू पोलिसांच्या दोन पथकांची कामगिरी



जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुजरात व नागपूर येथे शोधमोहीम राबवली. पोलिसांनी तिन्ही मुलींची सुखरूप सुटका क

.

बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. रितसर गुन्हे दाखल केले. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा तातडीने शोध घेण्यासाठी बोरगाव मंजू पोलिसांची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या तपास पथकांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे शोधमोहीम तीव्र केली. यात एका अल्पवयीन मुलीचा शोध गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथून लागला. उर्वरित दोन अल्पवयीन मुलींचा शोध नागपूर येथून घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तिन्ही मुलींना सुखरूप ताब्यात घेतले. त्यांना बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात आणले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, मूर्तिजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील वानखडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, मनोज उघडे, पोलिस अंमलदार अक्षय देशमुख, शेखर कोद्रे, सुदीप राऊत, पंकज बोराखडे, महिला पोलिस अंमलदार अश्विनी मनोहर, सायबर अंमलदार गोपाळ ठोंबरे, आकाश पांडे यांनी सहभाग घेतला. अल्पवयीन मूल बेपत्ता झाल्यास २४ तास थांबण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पालकांची तक्रार मिळताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. पोलिस हद्दीचे कारण सांगून तक्रार नाकारू शकत नाहीत. पालकांनी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन मुलाचा अलीकडील फोटो, कपड्यांचे वर्णन व मोबाइल क्रमांक द्यावा. तसेच तातडीच्या मदतीसाठी ११२ किंवा चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *