Headlines

जीवघेण्या संकटातही हसवणारे ‘घोसाळकर.. दार बंदच ठेवा’: कलाकारांची दमदार संवादफेक अन् अभिनय; वेषभूषा बदलणाऱ्या डिटेक्टिव्हने आणली रंगत



कौटुंबिक नातेसंबंध, गुन्हेगारी विश्व, जीवघेणी परिस्थिती व त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाची धमाल सांगड घालणारे “घोसाळकर… दार बंदच ठेवा!” हे नाटक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते. ही कहाणी घोसाळकर कुटुंबाभोवती फिरते. घोसाळकर ज्या साहेबा

.

आपल्यावर कधीही मृत्यू ओढवू शकतो, या भीतीने साहेब त्यांच्या मुलीचे लग्न लवकरात लवकर उरकण्याच्या तयारीला लागतात. त्यासाठी घोसाळकर कुटुंबातील एका तरुणासोबत मुलीचे लग्न जुळवण्याच्या हेतूने ते त्यांच्या घरी येतात. इथूनच नाटकातील धमाल विनोदांना सुरुवात होते. एकीकडे जीव वाचवण्याची धडपड असते. दुसरीकडे मुलीच्या लग्नाची घाई असते. या सगळ्या गोंधळात अडकलेली पात्रे प्रसंगागणिक विनोद निर्माण करतात. विशेषतः साहेबांचा डिटेक्टिव्ह हे पात्र नाटकात वेगळीच रंगत आणते. वेगवेगळे वेश परिधान करून साहेबांना बातम्या देण्यासाठी येणारा हा डिटेक्टिव्ह कधीकधी स्वतः साहेबांनाच ओळखू येत नाही. त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नाटकाचे कथानक हलकेफुलके असले तरी प्रसंगांची गुंफण, पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये व संवादांमधून निर्माण होणारी विनोदनिर्मिती ही या नाटकाची जमेची बाजू आहे. साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील गुंडगिरी आणि मुलीच्या लग्नासाठी सुरू असलेली त्यांची धावपळ यांतील विरोधाभास विनोदाला अधिक धार देतो.

कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखांना न्याय देत नाटकातील विनोदी वातावरण जिवंत ठेवले. अमोल इंगळे, अवनी डोईफोडे, अभय कुलट, नौकेश वानखडे, प्रशांत काळे, सृजन जटाले, प्रचिती कुलट आणि शेख इर्शाद शेख रफिक या सर्व कलाकारांनी उत्तम संवादफेक, देहबोली, प्रसंगानुरूप अभिनयातून नाटकाला रंगत आणली. स्नेहल कहाळे यांचे नेपथ्य कथानकातील घरगुती वातावरण प्रभावीपणे उभे करते. श्रेयस देशमुख यांचे पार्श्वसंगीत प्रसंगांमधील विनोद व नाट्यमयता अधोरेखित करते. बबलू गायकवाड यांची प्रकाशयोजना प्रसंगांना उठाव देते. सचिन पाटील यांची वेशभूषा व अमोल राणे यांची रंगभूषा व्यक्तिरेखांच्या स्वभावाला साजेशी ठरली आहे. संकेत तांडेल लिखित व वृंदा तायडे दिग्दर्शित हे नाटक गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील लग्नाचे नाट्य मांडते. गमतीशीर पात्रांच्या रेलचेलीमुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळते. ताणतणाव विसरून मनमुराद हसण्यासाठी हे नाटक नक्कीच पाहण्यासारखे आहे.

‘ब्लॅक कॉमेडी’चा नवा ट्रेंड यशस्वी गुन्हेगारी किंवा संकटासारख्या गंभीर विषयांतून निखळ विनोद निर्माण करणाऱ्या ‘ब्लॅक कॉमेडी’ व प्रसंगनिष्ठ विनोदी नाटकांना आजचा प्रेक्षक अधिक पसंती देत आहे. मुंबई-पुण्यावर अवलंबून न राहता अकोल्यातील स्थानिक लेखक, दिग्दर्शक व तांत्रिक चमू व्यावसायिक दर्जाची निर्मिती करत असल्याने स्थानिक रंगभूमीला नवे बळ मिळाले आहे. नेपथ्य, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेच्या अचूक वापरामुळे प्रसंग अधिक जिवंत होतात; परिणामी तरुण प्रेक्षकही मोठ्या संख्येने नाट्यगृहाकडे वळत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *