60 फूट खोल विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवदान:सुखरूप बाहेर काढण्यात यश, वारसा संस्थेने घेतला पुढाकार, प्राणीप्रेमींतून केले अभिनंदन
. येथून जवळच असलेल्या दापोरी गावात ६० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत एक गाय पडली होती. मात्र ‘वारसा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला जीवदान दिले. वारसा रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या गाईला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक क्षेत्रात…