डोक्यावरून आणलेल्या गंगा देवीचे कार्ल्यात श्रद्धेचे स्थान:नवरात्रोत्सवात दररोज भजन-कीर्तन व भंडारा; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी; विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयाेजन
. गाव विस्थापित झाले, राहते घरदार सुटले; मात्र आराध्य दैवतावरील निष्ठा कणभरही ढळली नाही. मोर्णा धरणामुळे कोसगाव हे मूळ गाव पाण्याखाली जाऊन विस्थापित झाल्यानंतर गावचे भाविक स्व. उत्तम नारायण करवते यांनी गंगा देवीच्या मूर्तीला डोक्यावर वाहून कार्ला येथे आणले. १९७१ मध्ये कुडामातीच्या एका साध्या खोलीत सुरू झालेली देवीची ही सेवा आज एका भव्य व देखण्या…