Headlines

एरंडोल तालुक्यात 97 टक्के पेरण्या पूर्ण:मात्र पावसाच्या दडीने शेतकरी वर्ग चितेंत, पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीच्या संकटाची धास्ती; गुंतवणूक धोक्यात‎

तालुक्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली, तरी पहिल्या दमदार पावसानंतर एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. तालुक्यात सुमारे ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा . एरंडोल तालुक्यात पहिल्या पावसाने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण केल्यामुळे बळीराजाने वेगाने पेरण्या उरकल्या. चालू हंगामात तालुक्यात अबालवृद्धांसह सर्वच शेतकऱ्यांनी मशागत…

Read More

1 टीएमसीची वाढ होणार:जायकवाडी धरणामध्ये आज पाणी पोहोचणार‎, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून 10,515 क्युसेकने विसर्ग सुरू‎

मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. त्यामध्ये सकाळी ६ वाजता ३,२२८ क्युसेक, दुपारी ३ वाजता ७,९२४ क्युसेक, तर दुपारी ४ वाजता त्यामध्ये वाढ होत ११,०७९ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग २१९६५ केला. संध्याकाळी यामध्ये पुन्हा…

Read More

कन्नडमधील तलाव कोरडेठाक:पाऊस लांबल्याने मत्स्य व्यावसायिक संकटात, पाऊस पडेल या आशेवर जलसाठ्यात बीज सोडण्याचा निर्णय‎

तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ खरिपाची पेरणी होईल एवढाच मर्यादित पाऊस झाला असून, बहुतांश पाझर तलाव आणि मुख्य जलसिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. नदी-नाल्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. या भीषण जलसंकटामुळे तालुक्यातील १० ते ११ हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू…

Read More

नागपूरमधून 11 दिवसांपासून बेपत्ता परसवानी कुटुंब सापडले:कुटुंब पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षित, एका ऑनलाइन ‘जी-पे’ व्यवहारामुळे पोलिसांना लागला शोध

नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचे गूढ अखेर अकरा दिवसांनंतर उकलले आहे. हे संपूर्ण कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षित असून, एका ऑनलाइन ‘जी-पे’ व्यवहारामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेता आला. . धंतोलीतील दुर्गा सदन इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, हर्षा परसवानी, इशिता, खुशी आणि कृष्णा हे पाच जण २४ जूनपासून अचानक बेपत्ता झाले होते. सर्वांचे मोबाइल…

Read More

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी काढण्याच्या नादात ३ निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सेल्फी घेताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने आणि त्यानंतर तिसऱ्याने एकमेकांचे हात धरले; मात्र दुर्दैवाने तिघेही ३० फूट खोल…

Read More

पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय:विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा विशेष निधी मंजूर!

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ही सर्व विकासकामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

Read More

परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला

नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे ट्रेस झाले. यानंतर नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. धंतोली येथील बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी इशिता, खुशी आणि मुलगा कृष्णा…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्‍यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार

तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्‍याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी…

Read More

पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले

वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला….

Read More

पडेगाव कचरा प्रकल्प म्हणजे दुसरे डम्पिंग ग्राउंड:अंबादास दानवेंचा विधान परिषदेत हल्लाबोल, मंत्री पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध…

Read More