Headlines

अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित:143 वेळा कॉल; खरातच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचाही आरोप

अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागानंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. खरातसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप भांडे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याच कारणास्तव त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचे समजते….

Read More

मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी:मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला हिरवा कंदील

मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’च्या विस्ताराला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत हा प्रकल्प वाढवण्याची मागणी केली होती, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. सध्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम संगम ते…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

'डायल 112' च्या मदतीला पोहोचण्यास उशीर:हिंगोलीत पोलिस अंमलदार निलंबित, पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘डायल 112’ सुविधेबाबत हिंगोली पोलीस दलाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. मदतीसाठी कॉल आल्यानंतर घटनास्थळी वेळेत न पोहोचल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. 14 काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांतर्गत…

Read More

Ladki Bahin Scheme: Rs 1500 Deposited, 3000 Expected

राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, लाभार् . फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. मे महिना उजाडल्यानंतरही खात्यात पैसे…

Read More

खासदार रामराव वडकुते ई-बाईकवरून पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात:म्हणाले – भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी गुरुवारी ता. १४ दुपारी ई बाईकवरून प्रवास केला. त्यांनी बाईकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालया गाठले. त्यानंतर तेथे जिल्ह्यातील विकास कामांसोबतच कायदा व सुव्यवस्थेवरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात ई-कार घेऊनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशात पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतुकीचा…

Read More

'लव्ह जिहाद'ला 'बाजीराव-मस्तानी'ने उत्तर द्या:मस्तानीला घरी आणणाऱ्या हिंदूला 1 लाखाचे बक्षीस; मिलिंद एकबोटेंचे वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला मी एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील…

Read More

मुंबईकरांना महागाईचा आणखी झटका! CNG दरात थेट 2 रुपयांची वाढ:वाहनचालक हैराण; सार्वजनिक वाहतुकीचं गणित बिघडणार

मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर 84 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते, मात्र अचानक झालेल्या या दरवाढीमुळे रिक्षा,…

Read More

अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी गर्दी; अजित पवारांनंतर बारामतीला नवे युवा नेतृत्व

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणारी शैली, नागरिकांशी थेट संवाद आणि तातडीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न यामुळे बारामतीत ‘जयदादा’ अशी ओळख तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दर गुरुवारी राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा जय पवार यांनी…

Read More

विमा नसलेल्या गाडीच्या मालक-चालकाला 44.75 लाखांचा दंड:पुणे अपघात न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल, कुटुंबाला 10 वर्षांनी न्याय

पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात विमा नसलेल्या वाहनाच्या मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर-पुणे रस्त्यावर 2015 मध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ही रक्कम 7 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मृत…

Read More